डिसेंबरमध्ये पूर्ण होणार चित्रिकरण
सद्यकाळात अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपट तयार केले जात आहेत. अशा स्थितीत मल्टीस्टारर बिग बजेट चित्रपट करत राहून उत्तम कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा अभिनेत्रींचा प्रयत्न असतो.

‘दे दे प्यार दे’ आणि ‘थँक गॉड’ या चित्रपटांमधील अभिनेत्री रकुल प्रीतने याच प्रयत्नांतर्गत छतरीवाली हा चित्रपट केला होता. रकुलने आता अनदेखी या वेबसीरिजचे दिग्दर्शक आशीष शुक्ला यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शविला आहे. या चित्रपटात रकुलसोबत दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता दिसून येणार आहे. हा एक कॉमेडी थ्रिलर स्वरुपाचा चित्रपट असणार असून याचे नाव अद्याप ठरलेले नाही. चित्रपटात या दोन्ही अभिनेत्रींसोबत अनेक प्रख्यात कलाकार असणार आहेत.
सर्वकाही सुरळीत राहिल्यास ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. तर डिसेंबरपर्यंत चित्रिकरण संपविण्याची निर्मात्यांची योजना आहे. कमर्शियल मसाला मल्टीस्टारर चित्रपट अन् कहाणींवर भर देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे रकुलने म्हटले आहे. रकुल लवकरच कमल हासन यांच्यासोबत ‘इंडियन 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे.









