वरुण श्रीधर यांची जागा घेणार : नफ्याची आकडेवारी जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वन97 कम्युनिकेशनच्या पेटीएम मनीने वरुण श्रीधरच्या जागी राकेश सिंग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)म्हणून नियुक्ती केली आहे. वरुण श्रीधर 2020 पासून पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात ही माहिती दिली आहे.
राकेश सिंग गेल्या महिन्यातच पेटीएम मनीत रुजू झाले आहेत. याआधी, ते पेमेंट कंपनी पेयू शी संबंधित फिनटेक कंपनी फिशडम येथे ब्रोकिंग सर्व्हिसेसचे सीईओ होते. रिपोर्टनुसार, वरुण श्रीधर यांना ग्रुपमध्ये आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पेटीएम मनीला 42.8 कोटींचा नफा
वरुण श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली पेटीएम मनीने नफा मिळवण्यास सुरुवात केली. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, पेटीएम मनीने 42.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.
फायदेशीर ठरल्यानंतरही, पेटीएम मनी डिस्काउंट ब्रोकिंग उद्योगात स्पर्धेला तोंड देत आहे. झिरोधा, ग्रो, अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग यांसारख्या कंपन्यांचे या उद्योगावर वर्चस्व आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मते, पेटीएम मनीकडे सुमारे 760,000 सक्रिय ट्रेडिंग क्लायंट आहेत.
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर प्लॅटफॉर्म
पेटीएम मनी लिमिटेड ही सेबीकडे नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर आणि डिपॉझिटरी सहभागी आहे, जी इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग, डिपॉझिटरी सेवा आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संबंधित सेवा प्रदान करते. पेटीएम मनी प्रेडा सोबत पॉइंट ऑफ प्रेझेन्स म्हणूनही नोंदणीकृत आहे, जे नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणुकीची ऑफर देते.
वन97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स वर्षात 43 टक्क्यांनी घसरले
वन97 कम्युनिकेशन्सचा शेअर 0.16 टक्केच्या घसरणीसह 371.80 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 दिवसांत स्टॉक 2.36टक्के, एका महिन्यात 9.52 टक्के आणि 6 महिन्यांत 58.87 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा समभाग 43.85 टक्के इतका घसरणीत राहिला आहे.