वृत्तसंस्था / मुंबई
प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी यु मुम्बाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी भारताचा माजी कर्णधार तसेच तीनवेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या राकेशकुमारची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर माहिती यू मुम्बाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
पहिल्या प्रो कबड्डी लीग हंगामात राकेशकुमार हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राकेशकुमार पांडेची यू मुम्बाच्या फ्रांचायझीनी प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचे घोषित केले. राकेशकुमार हा अर्जुन पुरस्कार विजेता कबड्डीपटू आहे.









