ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा भाजप उमेदवार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांनी पराभव केला. शिवसेनेच्या (sivsena) या पराभवावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रहार केला आहे. “शिवसेना ही महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि ‘ढ’ टीमचे कप्तान तोंडावर आपटले”, अशी टीका संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे.
अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेचे कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले. तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालानंतर विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.
“शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
अधिक वाचा : ‘या’ आमदारांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केलं नाही; संजय राऊतांनी जाहीर केली नावे
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी महाविकास आघाडीवर भारी पडल्याचं चित्र आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. त्यामुळे शिवसेना मनसेला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
.