मुंबई: दिवसभराच्या घडामोडी नंतर अखेर राज्यसभेत ची निवडणूक लागणार हे स्पष्ट झाले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी साठीची मुदत होती. मात्र शिवसेनेने आणि भाजपने देखील उमेदवार मागे न घेतल्याने राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी निवडणूक लागणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यात विजयी कोण होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानावर महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक बोलावली आहे.
आज काय घडल्या घडामोडी
घोडेबाजार टाळण्यासाठी मविआनं उचललं पाऊल
महाराष्ट्राचे राजकारण अतिशय प्रदुषित आणि गढुळ झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, घोडेबाजार हा शब्द अत्यंत वाईट पध्दतीने महाराष्ट्रात सुरु झाल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)माध्यमांशी बोलताना सांगितले. तर राजकारणात जो पैसा येतो तो कुठुन येतो याची चौकशी ईडीने करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्यसभेच्या निवडणूकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी मविआने पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआतील वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ‘मविआ’ची भाजपला आॅफर
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे भाजपाने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली. तसेच राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषदेमध्ये एक उमेदवार आम्ही तुम्हाला वाढवून देऊ अशी ऑफर दिली. बैठक संपल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम ?
राज्यसभेचा (Rajya Sabha Elections 2022) आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने (BJP) राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घेऊन हि निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली. मात्र भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यावर ठाम आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने देखील कोल्हापूरचेच माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
राज्यसभेतून शिवसेनेची माघार?
भाजपने (BJP)महाविकास आघाडीची ऑफर धुडकावल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे सहावे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) हे आज अर्ज माघार घेण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात शिवसेना (Shivsena) विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे चित्र दुपारी तीन नंतर स्पष्ट होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








