मुंबई : जितेंन्द्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि यशोमती ठाकूरांच्या (Yashomati Thakur) मतदानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. आव्हाडांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हातात मतपत्रिका दिल्याने हा आक्षेप घेण्यात आला होता. त्याचवेळी हा आरोप फेटाळण्यात आला होता. मात्र भाजपने पुन्हा फेरविचारणीसाठी अपील केले त्यानुसार यशोमती ठाकूर , आव्हाडांच्या मतपत्रिकेवर फेरसुनावणी सुरु झाली आहे. दरम्यान काॅंग्रेसच्या अमर राजूरकर यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) मतदानावर आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार यांनी मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हातात दिल्याने काॅंग्रेसने हरकत घेतली आहे.
दरम्यान भाजपचे आमदार पराग यांनी लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. यावेळी आयोगाने हा आरोप फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा भाजपाने अपील केले होते. यावर सुनावणी झाली असून भाजपाचा अपिल फेटाळण्यात आला आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात संजय पवार की धनंजय महाडिक? शौमिका महाडिक म्हणाल्या, विजयाची खात्री…
दरम्यान, काॅंग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आम्ही आरोप केला म्हणून आता हेही आरोप करत आहेत. यामध्ये काही तथ्थ नसून हा फक्त वेळकाढूपणा आहे. मतदानाच्या नियमात राहून मुनगंटीवार यांनी मतदान केले आहे. काॅंग्रेसने घेतलेल्या हरकतीला काहीही अर्थ नाही. निवडणूक आयोगाचे कॅमेरे तपासा तुम्हाला सत्य समजेल .भाजपने आरोप केला म्हणून तुम्हीही तसाच आरोप करावे याला काही अर्थ नसल्याचे बावनकुळे म्हणाले. मतपत्रिका बाद होणार नाही असेही ते म्हणाले. मात्र याबाबतीत काय होणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा- कोणताही आमदार अस्थिर होणार नाही; जयंत पाटलांचे अनिल बोंडेंवर टीकास्त्र
जितेंन्द्र आव्हाड काय म्हणाले,
भाजप नेते बावचळलेत त्यांच्याकडे काय कॅमेरा आहे का? तोंडाला येईल तसे काहीही बडबडत सुटले आहेत. मतदानाच्या नियमानुसार मी आणि यशोमती ठाकूर यांनी मतदान केले आहे. भाजप घाबरले आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








