मुंबई- देशातील आज चार राज्यांच्या १६ राज्यसभेच्या ( Rajyasabha) जागांसाठी मतदान आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हि प्रक्रिया पार पडणार आहे. देशातील राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १६ जागांसाठी चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे प्रमुख उमेदवार आहेत.
मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमधील सर्व ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. आज हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यात थेट लढत
महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार असून, तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार असल्यानं सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे.राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अत्यंत चुरस मानली जात आहे. शिवसेनेचा सहावा उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar ) आणि भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik )यांच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar)काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपापल्या पक्षांच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करून त्यांची रणनीती निश्चित केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत.
कोणाकडे किती मतं?
शिवसेना 55 आमदार,
राष्ट्रवादी 53,
काँग्रेस 44,
भाजप 106,
बहुजन विकास आघाडी ३,
समाजवादी पक्ष २
एआयएमआयएम २,
प्रहार जनशक्ती पक्ष २
मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी १
अपक्ष १३
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








