सांगली / संजय गायकवाड :
सांगली शहरातील मध्यवर्ती चोक अशी ओळख असणाऱ्या राजवाडा चौकाला समस्यांनी घेरले आहे. काळाच्या ओघात हा चौक खूपच लहान आणि अरूंद वाटू, लागला आहे. सांगलीच्या बसस्थानकांकडे वळणाऱ्या एसटी, खासगी आरामगाड्या आणि अवजड वाहने यांना चौकातून वळताना मोठी अडचण होते. गाडया वळत नसल्याने चालक वाहतुकीचे नियम तोडून गाड्या पळवत आहेत. येथे छोटे मोठे अपघात होत आहेत. चौकांच्या बाजूला असलेली ग्रील आणि बेरेकेटस काढली तर चौक मोठा होवू शकतो. आयुक्का सत्यम गांधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुधारणा करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिक व बाहनचालकांतून केली जात आहे.
सांगलीतील अन्य चौकाप्रमाणेच राजवाडा चौकाचीही दुरावस्था कायम आहे. पूर्वी राजवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय असताना या चौकातून सर्व मोर्चे आंदोलने पुढे राजवाडयात जात असत. सध्या राजवाड्यात अप्पर तहसिलदार कार्यालय, न्यायालयाच्या काही इमारती, जिल्हा कारागृह उपनिबंधक कार्यालय, दस्त तयार करणारे छोटे मोठे व्यावसायिक, पुरोहित कन्या प्रशाला, पटवर्धन हायस्कूल, आठवले विनय मंदिर, पुतळाबेन शाह शिक्षणशास्त्र महाविद्यालय, दरबार हॉल, शासकीय वस्तुसंग्रहालय, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे यांचे निवासस्थान आहे. रिसाला रोड आणि बदाम चौकाला जोडणारा रस्ता अशा स्वस्त आणि मोठी वर्दळ असणारा हा सगळा भाग राजवाडा चांकाशी संबंधित आहे.
शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस राजवाड्यातून अनेक शाळकरी मुले मुली सायकवरून राजवाडा चौकातून पुढे जात असतात. सकाळी व संध्याकाळी राजवाडा चौकात मोठी गर्दी असते. या चौकात आयसीआयसीआय बँकेन्या कोपऱ्यावर किमान चार ते पाच वाहतूक पोलीस उभे असतात.
अन्य चौकाप्रमाणेच राजवाडा चौकापासून सिटी पोस्ट ऑफीसच्या दारात रिक्षावाले उणे असतात. त्यांना पुढे गाइया नेण्यासाठी वाहतूक पोलीसांना दिवसभर यांच्या मागे शिट्टया वाजविण्याचेच काम करावे लागते. अर्थातच राजवाडा चौकात वाहनचालक आणि वाहतूक पोलीसांची वादावादी ही नित्याचीच बाब आहे. येथे टफीक सिग्नलची सोय आहे. पण टायमर नसल्याने अगदी कमी वेळेत लाल दिवा लागतो. त्यामुळे वाहनचालकांची कसरत होते. दुसरीकडे स्टेशन चौकाकडून आलेला रस्ता अरुंद आहे. सिग्नल लागल्यानंतर या चौकातून डाव्या बाजूने राजवाडाच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना सिग्नल पडेपर्यंत वळता येत नाही.
भारती विद्यापीठ समोरून पटेल चौकाकडे जाणाऱ्या वाहनांचीही तशीच अवस्था आहे. येथेही रस्ता अरुंद असल्याने पटेल चौकाकडे वाहनांना वळता येत नाही. पटेल चौकाकडून येणारी व स्टेशन मौकाकडे जाणारी वाहनेही या मौकातून डाव्या बाजूने वळू शकत नाहीत. काही वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून वखारभागातील रख्याने स्टेशन बौकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात.
- राजवाडा चौकाच्या सुधारणेसाठी पाठपुरावा करणार
राजवाडा हा सांगलीतील प्रमुख चौक आहे या चौकातून अगदी रिक्षावाल्यापासून ते अवजड, ऊस वाहतूक करणारी वाहने, खासगी आरामगाड्या, एसटी बसेस अशा शेकडो वाहनांची ये जा असते चौक अरुंद असल्याने येथून गाड्या वळू शकत नाहीत. छोटी मोठी सर्वच वाहने वाहतुकीचे नियम तोडून पुढे नेत असतात. राजवाडा चौकाच्या दुरावस्थेला केवळ मनपा, वाहतुक पोलीस अथवा वाहनचालक अरो एकमेकाना दोष देण्यापेक्षा येथील समस्या दुर करण्यासाठी प्रयत्नाची आवश्यकता आहे. या प्रभागातील माजी नगरसेविका या नात्याने या चौकाबाबत नेमके काय करता येईल यासाठी आम्ही लवकरच आयुक्त सत्यम गाधी यांची भेट घेवून मार्ग काढू,
-अॅड. सौ. स्वाती शिंदे, माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक १६








