कोल्हापूर प्रतिनिधी
कांद्यावरून राज्यासह देशातले राजकारण तापले असून केंद्र सरकारने नुकताच दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी केंद्राची अवस्था असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी केंद्र सरकारची अवस्था झालेली आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदी करण्याची गरज होती तेव्हा तो विकला आणि शेतकऱ्याची माती केली. खरेदीचा दर 24 रुपये ऐवजी किमान 30 रुपये हवा होता. अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली. कांद्याची दरवाढ ही महिनाभर टिकेल पुन्हा कांद्याचे दर खाली येतील. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारने असे माकड चाळे करू नयेत,असा सज्जड दम ही शेट्टी यांनी दिला आहे.









