कोल्हापूर : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सध्या 22 दिवस पदयात्रा काढत असून यादरम्यान त्यांनी आपल्या आई बद्दल भावनिक पोस्ट लिहिली असून माझ्या आऊने दिलेल्या पाठबळानेच मी ही ५२२ किमी ची यात्रा पूर्ण करणार आहे. असा विश्वास व्यक केली आहे.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहल आहे की, दोन महिन्यापुर्वी माझ्या आऊची धाप वाढली होती..अन्ननलिकेला सूज आलेली होती.
हेही वाचा>>> स्वाभिमानीच्या पदयात्रेदरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राजू शेट्टींची विचारपूस
अन्नप्राशन करताना त्रास होत होता…४ दिवसांवर कोल्हापूरचा धडक मोर्चा आला होता. १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला धडक मोर्चा घेतला होता. कारखानदार काहीच निर्णय न घेतल्याने कोल्हापूर धडक मोर्चेत पदयात्रेची घोषणा करणार होतो. पण आऊची तब्येत इतकी जास्त बिघडलेली होती कि पदयात्रा घोषणा केली तर आऊसोबत राहता येणार नाही हा विचार मनात आला. त्यावेळेस तिला कायमस्वरुपी ॲाक्सिजनची गरज होती. त्यातून थोड्या दिवसांनी माझी आऊ सावरली आणि तिला मी पदयात्रा काढण्याबद्दल कल्पना दिली. दोन महिने अंथरुणाला खिळलेली आऊ आधार घेत उठून बसली आणि मायेने माझ्या चेह-यावरुन हात फिरवत म्हणाली, “राजू तू चालून ये, मला काही होणार नाही…” तिच्या बोलण्यात चैतन्य दिसतं होतं ..त्यानंतरच मी २ ऑक्टोबरला पदयात्रेची घोषणा केली. तिने पदयात्रेबद्दल विचारपुस करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं…माझ्या आऊने दिलेल्या पाठबळानेच मी ही ५२२ किमी ची यात्रा पूर्ण करणार आहे.









