कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते तहान मांडून बसले आहेत. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले असून बेमुदत आंदोलन हे सुरू राहणार आहे. यामुळे स्वाभिमानीकडून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलन स्थळाच्या बाजूलाच असलेल्या जागेत चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला आणि शेतकऱयांची पंगत बसली. यावेळी राजू शेट्टी यांनी सर्व शेतकऱ्यांना जेवण वाढले तसेच शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरच जेवायला रस्त्यावरच बसले.









