शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
शिरोळ प्रतिनिधी :
जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर वाढला असून सुमारे साडे सहा हजार रुपये दर झाला आहे तर देशात सध्या किमान साखरेला साडे अडतीसशे रुपये भाव मिळत आहे यामुळे मागील ऊसाला किमान चारशे रुपये मिळालेच पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केली आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना चारशे रुपये मिळत नाहीत तोपर्यंत उसाला कोयता लावू देणार नाही व साखर कारखान्याच्या गोडाऊनमधून साखरही सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदन देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश यात्रेला सुरुवात झाली. शिरोळ शहरातील प्रमुख मार्गावरून आक्रोश यात्रा येत असताना माजी खासदार राजू शेट्टी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले .
आक्रोश यात्रा शिवाजी चौकात आल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या समोर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर उद्योगातील हिशोब करूनच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाची मागणी केली आहे आणि ते पैसे शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही यावर्षी साखरेचे भाव वाढले आहेत त्यामुळे साखर कारखानदारांच्या कडे किमान 500 ते 600 रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये मिळालेच पाहिजेत. याकरिता प्रत्येक साखर कारखानदारांच्या दारात जाऊन ढोल वाजून त्यांना निवेदन देणार आहे याकरिता या आक्रोश यात्रेच्या माध्यमातून 37 साखर कारखान्यांच्या दारात जाणार आहे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेपूर्वी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर चारशे रुपये जमा करावेत अन्यथा ऊस तोडू देणार नाही व साखर कारखान्यातील साखर बाहेर जाऊ देणार नाही.” असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील जनार्दन पाटील माजी उपसभापती सचिन शिंदे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार मिलिंद साखरपे आप्पासो पाटील नगरसेवक प्रकाश गावडे विश्वास बालीघाटे अण्णासाहेब चौगुले सुभाष मगदूम राहुल सूर्यवंशी सतीश चौगुले आलम मुल्लानी विठ्ठल मोरे सागर संभूशेट्टी शैलेश आडके बंडू पाटील शंकर नाळे अनिल चव्हाण सागर मादनाईक प्रदीप चव्हाण अंकुश माने प्रकाश माळी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राजू शेट्टी यांच्या आक्रोश पद यात्रेला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी पद्या ते सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था गावागावातून करण्यात आले यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनाही निवेदन देण्यात आले,,,,








