Raju Shetti on Barsu Refinery : बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन चिघळले आहे. पोलीसांनी काल प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला केला. तसेच अश्रुधूर सोडला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले. यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगीशी खेळ करू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर बारसू प्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी ही शेट्टी यांनी केली आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कोकणात प्रचंड ऊन आहे. अशा ऊन्हात महिलांना, शेतकऱ्यांना बेशुध्द होईपर्यंत मारहाण केली. बेशुध्द झाल्यानंतर सुध्दा त्य़ांच्य़ावर उपचार केले नाहीत.ही गोष्ट संतापजनक आहे. या प्रकरणी पोलीसांची चौकशी करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महिलांना रक्तबंबाळ होईपर्यंत ओढत नेल गेलं, एका महिलेच्या कानातील डुल ओढले गेले, एकीचा मोबाईल घेतला गेला. तो अजून परत केला नाही. पोलीस संरक्षणासाठी गेले आहेत का चोरी करायसाठी गेले आहेत? पोलीसांची दंडेलशाही कशासाठी असा सवाल ही त्यांनी केला. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. कोणतीही तारीख न सांगता आम्ही थेट बारसूमध्ये जाणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सल्ला देताना राजू शेट्टी म्हणाले की, रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांना नको असेल तर रिफायनरी आम्ही लादणार नाही अशी घोषणा करा.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आगीशी खेळ करू नये असा इशारा यावेळी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








