कापशी- मुरगूड मार्गावर हळदवडे गावाजवळ झाली भेट; रस्त्यावरच केली शेट्टी यांच्याशी चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रोश पद यात्रेमध्ये चालण्राया माजी खासदार राजू शेट्टी यांची गाडीतून रस्त्यातच उतरत विचारपूस केली. सेनापती कापशी -मुरगुड मार्गावर कागल तालुक्यातील हळदवडे गावाजवळ ही भेट झाली.
हेही वाचा >>>स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पदयात्रे दरम्यान आपल्या आई बद्दल भावनिक पोस्ट
सायंकाळी साडेचारच्या सुमाराला मंत्री मुश्रीफ बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील ज्येष्ठ नेते आनंदरावदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून मुरगूडकडे येत होते. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सेनापती कापशीकडून मुरगूडकडे येत होती. मंत्री मुश्रीफ यांनी रस्त्यातच गाडी थांबवून शेट्टी यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. दोन-तीन मिनिटाच्या औपचारिक भेटीनंतर मंत्री मुश्रीफ गाडीत मुरगूडकडे मार्गस्थ झाले.









