Raju Shetti News: सरकार तुम्हाला आवडो ना आवडो मात्र जनतेची गाऱ्हानी घेऊन सरकारकडेच गेलं पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सात नोव्हेंबर नंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. आज जयसिंगपूर येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रचलित पद्धतीने मिळणाऱ्या एकरकमी एफआरफीसोबत 350 रू द्यावेत.गेल्या वर्षी साखर उत्पादनातून मिळालेली रकमेचे 200 रुपये दयावेत अन्यथा 17 नोव्हेंबर पासून कारखानदारांचा ऊस पुरवठा रोखणार असल्य़ाचा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले,राजू शेट्टींनी काढलेल्या मुद्द्यामध्ये कारखानदारांनी दोष काढावेते. ते गप्प आहेत याचा अर्थ हे सर्व मुद्दे बरोबर आहेत हे कळतेय.त्यामुळे रेटत न्यायचं तेवढं रेटत न्यायच,जेवढे हाणता येईल तेवढे हाणायचे असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
अधिक वाचण्यासाठी- हसन मुश्रीफ चेकमेट…के.पी, आबिटकरांना थेट आव्हान
राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ऊस उगळता सर्वच पिके अतिवृष्टीमुळे बाद झाली आहेत.अशी परिस्थिती असताना,ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी कोणती परिस्थिती यावी लागेल, असा सवाल त्यांनी केला. राज्यातील कृषी मंत्री अतिशय अनुभवी आणि जाणकार आहेत, माझा अभ्यास कमी पडतोय त्यांनीच आता आमच्या ज्ञानात भर टाकावी असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.