Raju Shetti : भारत सरकार आज रासायनिक खत विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारते. हा प्रकार म्हणजे शेतीमध्ये जात आणि धर्मवाद आणणे असा आहे.शेतकरी हा स्वतःला एकच जात मानतो,मात्र सरकार शेतकऱ्यांमध्ये जातीत भेदभाव करतेय.शेतकऱ्यांचा अपमान करणारा हा निर्णय तातडीने बंद करावा.त्याबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीं,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.याबाबत आज त्यांनी फेसबुकवीर व्हिडिओ शेअर केला.
शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करणं हे बेकायदेशीर आहे.सरकारने शेतकऱ्यांची चेष्ठा करणारा प्रकार थांबवावा अन्यथा शेतकरी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
काय म्हटलय पत्रात
उपरोक्त विषयास अनुसरून देशातील शेतकऱ्यांना रासायनिक खताची खरेदी करत असताना ॲानलाईन नोंदणीमध्ये जातीची अट टाकण्यात आली आहे.भारतीय संविधानात अनुच्छेद १५ प्रमाणे कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे केवळ धर्म,वंश,जात,लिंग,जन्मस्थान या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद आहे.सरकार व खत कंपन्याकडून रासायनिक खताची विक्री करत असताना जातनिहाय अनुदान देण्याबाबत कोणतीही योजना नाही.
तथापी रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे.जात विचारून खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.देशातील शेतकरी जातीमध्ये विभागला नसून ‘शेतकरी’ही एकच शेतकऱ्याची जात आहे.सरकारच्या या गंभीर चुकीमुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होत असून, याबाबत तातडीने सुधारणा होणेसंदर्भात संबधित विभागास आपणाकडून योग्य ते आदेश व्हावेत अशी नम्र विनंती राजू शेट्टी यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









