Raju shetti : जिथं संघटना मजबूत केली तिथं उसाला दर मिळाला मात्र जिथं संघटना मजबूत आणि एकजूट नाही केली तिथला शेतकरी उसाच्या दरापासून 250 रुपयाने मागे राहिला आहे. सहकार मोडीत काढण्याचा राज्यातील भस्मसुराचा डाव मोडीत काढण्याचे काम संघटनेने केल्यामुळे संघटना आणखीन मजबूत झाली.तुम्हाला लढायचे असेल तर पाऊस काय? बॉब पडले तरी जागा सोडायची नाही असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.आज जयसिंगपुरात साखर परिषदेत शेतकऱ्यांना संबोधन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडले.दोन टप्प्यातील एफआरपी हा नियम आणि भूमी अधिग्रहण नियम शिंदे सरकारने बदलावे. केवळ मावस भाऊ आणि मिळून खाऊ असे चालू देणार नाही असा इशाराही यावेळी त्य़ांनी दिला.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ऊस तूटल्यानंतर 14 दिवसात एकरकमी एफआरफी रक्कम जमा करावी. कारखानदारांची काटामारी वाढली आहे. राज्यातील दरोडेखोर साडेचार हजार कोटींचा दरोडा काटमारीतुन टाकला जातो. राज्य सरकार झोपले आहे का? तुम्ही गप्प आहेत याचा अर्थ तुमची मिलिभगत आहे का? असा सवाल ही शेट्टी यांनी केला.
हेही वाचा- Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ‘हे’ ठराव करण्यात आले
सभासदांनी किंवा वाहनदारानी आवाज उठवला तर त्याची गाडी कारखान्यातून काढून टाकली जाते.स्वाभिमानी शेतकरी संघटना काटामारीवर खुली चर्चा करणारचं, पुढील आठवड्यात महासंचालकांची भेट घेऊन 200 काट्याची चौकशीची मागणी करणार, जर करणार नसतील तर तुम्ही त्यांना सामील आहात का? याचा जाब त्यांना विचारणार.तुम्ही दरोडेखोर नाहीत तर तुम्हाला राग का येतो, असा कारखानदारांना सवाल राजू शेट्टी यांनी केला.
Previous Articleतळाशील कवडा रॉकजवळ पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ
Next Article बांदेकर ब्रदर्सच्या भट्टीला आग








