Raju Shetti News : जनता महागाईने त्रस्त आहे.नद्या कोरड्या पडल्या आहेत. गारपिटीमुळे नुकसान झाले.या सगळ्या वरून लक्ष विचलीत करण्यासाठी राजकीय भूकंप येणार अशी अफवा उठवली जात आहे. राज्याच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.राजकीय भूकंप वगैरे बकवास आहे. जे काय करायचं हे यांच आधीच ठरलयं.पण जनता आता कोणावरच विश्वास ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कावेळी घटलेल्या घटनेविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कोणाला द्यावा हा सर्वस्वी सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे.मात्र एवढा मोठा कार्यक्रम करताना बंदिस्त ठिकाणी करायला हवा होता. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही पक्षीय गर्दी जमवली गेली होती. 25 लाखाचा पुरस्कार द्यायला सव्वा 13 कोटी खर्च झाले असे ऐकायला मिळतयं,दुसरीकडे नुकसान भरपाई प्रोत्साहन पर अनुदान पैसे नाहीत म्हणून थांबले आहेत.सरकार सगळ्याच बाबतीत राजकारण करायला लागलय असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
दुष्काळ पडला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील धरणं भरतात हा इतिहास आहे. पाऊस कमी पडणार हे कोणत्या अतिशहाण्याने सांगितलं माहित नाही.धरणात पाणी असताना उपसा बंदीचा आदेश काढणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्य़ाचे राजू शेट्टी म्हणाले.
Previous Articleट्राय करा कच्च्या केळीची स्वादिष्ट भजी
Next Article Sangli : गाताडवाडीत बेवारस वृध्दाचा आढळला मृतदेह









