बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजू उर्फ असिफ सेठ यांना दिवसेंदिसव भरघोस पाठिंबा मिळत आहे.
शुक्रवारी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील कसाई गल्ली परिसरात काँग्रेसचे उमेदवार राजू उर्फ असिफ सेठ यांनी प्रचार केला. समता सर्वधर्म सेनेच्या कार्यकर्त्यांशी आणि येथील नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. यावेळी ते म्हणाले, बेळगावची जनता अनेक समस्यांना झुंज देत आहेत.
यासर्व समस्यांचा तोडगा हवा असेल तर १० मे रोजी मतदानासाठी दिलेली सुट्टी वाया न घालवता प्रत्येकाने मतकेंद्रात जाऊन मतदान करावे आणि पुढील ५ वर्षांसाठी मला जनसेवे करण्याची संधी द्यावी. काँग्रेस सरकार ४० % कमिशन घेणारे नसून देशाच्या १००% विकासाबद्दल कटिबद्ध आहे.यावेळी राजू सेठ यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले.










