बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी छत्रपती शिवाजी नगर आणि अंजनेयनगर परिसरात प्रचार केला.
विधानसभा निवडणूक २०२३ च्या रिंगणात उतरलेले उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी बुधवार दि. ०३ रोजी छत्रपती शिवाजी नगर आणि अंजनेयनगर परिसरात प्रचार केला. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेतली. यावेळी मतदारांनी आसिफ (राजू) सेठ यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत आले. उमेदवाराला भेटण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता.
यावेळी आसिफ (राजू) सेठ म्हणाले, ” छत्रपती शिवाजी नगर मधील लोक रस्ता आणि पाण्याच्या सुविधांपासून वंचित आहेत, मी निवडून आल्यानंतर या सर्व समस्या दूर करण्यात येतील. मला बेळगावची जनता हवी आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात हेच ध्येय असल्याचे सांगितले.










