बेळगाव उत्तर मतदारसंघात निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्यात सुरू आहे. मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी आझम नगरला भेट दिली जिथे त्यांच्यासोबत केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि माजी आमदार फिरोज सेठ यांच्या उपस्थित प्रचारसभा पार पडली.
यावेळी बोलताना माजी आमदार फिरोझ सेठ म्हणाले, “भारताच्या विकासासाठी धर्मनिरपेक्ष असणे खूप महत्वाचे आहे. काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही पक्ष जास्त धर्मनिरपेक्ष नाही, एकजूट होऊन पुढे जावे आणि 40% भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली उतररावे हीच आमची इच्छा आहे.
उमेदवार आसिफ (राजू) सेठ म्हणाले, “आम्ही मस्करी करीत नसून, आम्ही हमी देत आहोत, कर्नाटकातील लोकांना लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस पक्षावर कर्नाटकातील जनतेचा एक अतूट विश्वास आहे.
केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले, “आम्ही जात-पात आणि धर्मावर निवडणूक लढवत नसून कर्नाटकातील जनतेची समस्या दूर करण्यासाठी लढत आहोत, कॉंग्रेसला मतदान करा असे सांगून. राज्याच्या विकासाकरिता काँग्रेसला सत्तारूढ करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मोठया संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक सहभागी झाले होते.











