महिला संगीत नाट्या स्पर्धा 1 डिसें.तर फुगडी स्पर्धा 1 जाने.पासून
फोंडा : राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती चौथी अखिल गोवा पातळीवरील ऐतिहासिक नाट्या स्पर्धा 1 नोव्हें. ते 3 डिसें. दरम्यान कला मंदिरच्या मास्टर दत्ताराम नाट्यागृहात आयोजित करण्यात आली आहे. कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी साहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील केरकर व श्रीकांत गावडे हे उपस्थित होते. स्पर्धेचे प्रवेश अर्ज 8 सप्टें.पासून कलामंदिरच्या कार्यालयात उपलब्ध असतील. प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 29 सप्टें. अशी आहे. गोव्यातील कुठल्याही हौशी नाट्या संस्थेला या स्पर्धेत सहभागी होता येईल. सर्वोत्कृष्ट नाट्याप्रयोगासाठी प्रथम रु. 60,000, द्वितीय रु. 50,000, तृतीय रु. 40,000, उत्तेजनार्थ प्रथम रु. 30,000, द्वितीय रु. 25,000, तृतीय रु. 20,000 व प्रोत्साहनपर रु. 5000 तसेच अन्य वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. दरम्यान, कला मंदिरची अखिल गोवा पातळीवरील महिला संगीत नाट्या स्पर्धा 6 डिसें. ते 26 डिसें. दरम्यान होणार आहे. तर पंधरावी अखिल गोवा पातळीवरील महिला फुगडी स्पर्धा 1 जाने. ते 15 जाने. 2024 या कालावधीत घेण्यात येईल, अशी माहिती सुनील केरकर यांनी दिली.









