प्रवीण प्रजापती गडाचा राजा तर प्रतीक्षा कुरबरला गडाच्या राणीचा किताब
बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवारी येळ्ळूर येथील राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रवीण प्रजापती याने ‘राजहंसगडचा राजा’ तर प्रतीक्षा कुरबर हिने ‘राजहंसगडची राणी’ हा किताब मिळविला. लहान, मध्यम व खुल्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
लहान गट मुली- प्रथम प्रांजल धुडुम, द्वितीय मुस्कान शेख, तृतीय सोमय्या शेख, मुलगे- प्रथम प्रणव बेनके, द्वितीय संदीप राजपूत, तृतीय भरत बेलपूल, मध्यम गट मुली- प्रथम प्रणाली मोदगेकर, मध्यम गट मुलगे- प्रथम शिवम कोपर्डे, द्वितीय प्रितम कुरबर, तृतीय अथर्व सायनेकर, खुला गट मुली-प्रथम प्रतीक्षा कुरबर, खुला गट मुलगे- प्रथम प्रवण प्रजापती, द्वितीय किसन टक्केकर, तृतीय गणेश सालगुडे यांनी मिळविला.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यवाह विजय पाटील, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, धामणे ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री व मोतेश बार्देशकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मदन बामणे यांनी केले. अंकुश केसरकर, नेताजी जाधव यांनी सहभागी धावपटूंचे कौतुक केले. विजेत्यांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू ओऊळकर, सुनील आनंदाचे, बाबू कोले, प्रकाश गडकरी, आकाश भेकणे, प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले.
चिमुकल्याचा विशेष सन्मान
सात वर्षाच्या स्वराज काकतकर याने राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धेत सहभाग घेऊन ती यशस्वीरित्या पूर्ण केली. चिमुकल्याच्या या साहसाबद्दल त्याचा मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.









