कबनूर, वार्ताहर
Kolhapur : येथील तिरंगा कॉलनी परिसरातील राजगिरे परिवाराने घरामध्ये “किल्ल्यांची दुरावस्था” हा बोलता देखावा करुन छ. शिवाजी महाराज हे लोकांना संदेश देत असल्याचे या द्वारे दाखविले आहे. हा देखावा पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.तसेच एका शाळेने भेट देवून त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना हा देखावा दाखविण्यात आला.उपस्थित शिवभक्तांनी भेटी देवून त्यांची प्रशंसा केली.सद्या गडकिल्ल्यावर पर्यटक कचरा करतात,प्रियकरांची नावे लिहून किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करतात.ते होवू नये यासाठी स्वतः छ.शिवाजी महाराज किल्ल्याच्या ठिकाणी अवतरतात व म्हणतात,मराठा साम्राज्य उभे करण्यासाठी मावळ्यानी प्राणाची आहुती दिली.स्वराज्य स्थापनेसाठी रक्ताचे पाट वाहिले.त्यांचे बलिदान व्यर्थ जावू देवू नका.किल्ल्यांचा अपमान म्हणजे आमचा अपमान.मिरवणुकीत जो पैसा खर्च करता तो देशसेवा,किल्ल्यांची दुरुस्ती व स्वच्छतेवर खर्च करुन तो सत्कारणी लावावा असा देखावा केला आहे.
राजगिरे परिवाराने यापूर्वी दुष्काळ,पुरग्रस्त अशा चालू घडामोडीवर दरवर्षी देखावे करुन एक प्रकारे या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.यामध्ये प्रदीप राजगीरे, वैशाली राजगीरे,प्रविण राजगीरे, अश्विनी राजगीरे यांचा सहभाग होता.