सुवर्णकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भामरे यांनी केले अभिनंदन !
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी राजेश पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे. सुवर्णकार जिल्हा संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील असलेले राजेश पनवेलकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांची निवड होताच सुवर्णकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भामरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार बांधवांकडून अभिनंदन होत आहे.









