प्रतिनिधी,कोल्हापूर
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनीही प्रदेश राष्ट्रवादीच्या संघटन सचिवपदाचा राजीनामा सादर केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना लाटकर यांनी राजीनामा पत्र पाठविले आहे. त्यामध्ये लाटकर यांनी म्हटले आहे, शरद पवार साहेबांचा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. साहेबच पदावर राहणार नसतील, तर आम्हीही पदावर राहू इच्छित नाही. त्यामुळे मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन सचिवपदाचा राजीनामा देत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









