कोल्हापूर: शिवसेनेचे मागील पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना भवन दिले नाही. हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. तर आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. ही शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आज बोलताना दिली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे गटाची पदाधिकारी निवड लवकरच जाहीर करण्यात येईल. उद्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर केले जातील. त्यानंतर शहर पदाधिकार्यांची निवड होईल. असे सांगत माझेच कार्यालय जिल्ह्यातील शिवसेना भवन होईल, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









