राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढविणार; राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
प्रतिनिधी,कोल्हापूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकात ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर जिल्हा पातळीवर निवडणूक लढविण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी गावपातळीवर पदाधिकारी नियुक्त करण्याबरोबर इच्छुकांशी संपर्क करण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी दिल्या.
राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या तर कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच एवढय़ा मोठ्या ृप्रमाणावर निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मोठय़ा ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे.या निवडणुकीच्या तयारी आणि नियोजासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठेतील शिवालय,शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
प्रारंभी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, पक्षात ज्येष्ठ आणि युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.ज्येष्ठ व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा.उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख यांनी गावपातळीवर पदाधिकारी,शाखा यांच्या नियुक्त्या पूर्ण करून घ्याव्यात.सभासद नोंदणी अभियानाचेही आयोजन करावे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना राज्यात आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असल्याने विकास कामे आणि राज्य शासनाचे जनहिताचे निर्णय या जोरावर मतदारापर्यंत पोहचण्याचा मार्ग तयार झाला आहे.नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक स्वरूपात शिवसेनेचा संपर्क असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चाचपणी करावी.इच्छुक उमेदवारांशी संपर्क करावा. त्यांच्या सामाजिक व विकासात्मक कामाचाही आढावा घेण्यात यावा. गावपातळीवर जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या स्थापन कराव्यात.या कमिट्यांच्या माध्यमातून गावा-गावात दौरे करून जनसंपर्कावर भर द्यावा.ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद लोकनियुक्त असल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांवरही लक्ष केंद्रित करावे.आगामी ग्रामपंचायत निवडणुकाच्या दृष्टीने गावपातळीवर चाचपणी करून त्याचा अहवाल दोन -तीन दिवसात सादर करावा,अशा सूचनाही क्षीरसागर यांनी केल्या.
दक्षिण व करवीर विधानसभातर्गंत कमिटी नियुक्त
राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार प्राथमिक स्वरूपात दक्षिण विधानसभा आणि करवीर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत ग्रामपंचायतीकरिता दोन कमिटय़ा स्थापन करण्यात आल्या. दक्षिण कमिटीमध्ये जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उप-जिल्हाप्रमुख रमेश खाडे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे यांचा समावेश आहे. तर करवीर विधानसभा मतदारसंघातील कमिटीमध्ये उप-जिल्हाप्रमुख प्रा.शिवाजीराव पाटील, उप-जिल्हाप्रमुख उदय भोसले, उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उप-जिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उत्तर समन्वयक सुनील जाधव हे काम पाहणार आहेत.









