कोल्हापूर: देव मंदिरात राहिला पाहिजे हे म्हणत होतो पण देवाला बाहेर काढलं आणि टीका होऊ लागली. हे आता त्यांनीच मान्य केलं. केलेली युती लोकांना पटली नव्हती याचा अनुभव आम्हाला येत होता. ही गद्दारी नाही क्रांती आहे. पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावं असा सल्ला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उध्दव ठाकरे यांना दिला. काल मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांनी आक्रोश मोर्चा काढला होता. तसेच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत बंडखोरांवर टीका केली त्याला प्रत्यूत्तर क्षीरसागरांनी दिले. यावेळी राऊतांवरही निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना दुसऱ्याच्या हातात जात होती म्हणून ही क्रांती करावी लागली. दर 15 वर्षांनी ही परिस्थिती का येते याचा विचार आता वरिष्ठांनी केला पाहिजे. पक्षाला आयुमर्यादा असते. असा पक्ष चालत नाही. पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्या कडून शिकावं असा सल्ला त्यांनी दिला.नवाब मलिकचे दाऊदशी संबध असे अनेक मुद्दे असताना बोलता येत नव्हते. कसलं हिंदुत्व आमचं राहील होत असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही सोडणार नाही.पोटनिवडणूकीमध्ये माझा त्याग असताना राज्यसभेला माझी आठवण झाली नाही. निवडून येण्यात आमचं देखील कर्तृत्व आहे. या क्रांतीचा गांभीर्याने विचार करावा. जे काय घडलंय त्याला मान्यता द्यावी. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून वाईट नाहीत. पण काही नेते कानात सांगतात. ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवला असा संजय राऊत यांच्यावर आरोप केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









