राजेंची आणि राज ठाकरेंची फोन पे चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
मनसेचे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे प्रथमच साताऱयाच्या दौऱयावर आले होते. त्यांनी आल्या आल्या खासदार उदयनराजे हे साताऱयात आहेत काय अशी विचारणा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्याकडे केली. त्यांनी महाराजसाहेब आहेत असे सांगताच सकाळी जलमंदिरच्या दिशेने अमित ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा वळाला. जलमंदिरवर पोहचल्यानंतर अमित ठाकरे यांनी खासदार उदयनराजेंना मुजरा करत त्यांच्याशी हितगुज केले. त्याच दरम्यान खासदार उदयनराजे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोनवर संवाद झाला. हसतखेळत दोघांमध्ये फोन पे चर्चा झाली.
मनसेचे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे साताऱयात प्रथमच दौऱयावर आल्यानंतर त्यांच्या दौऱयाचे नियोजन जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते. त्यांनी प्रथमच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळय़ास अभिवादन करत जलमंदिर पॅलेस येथे जावून खासदार उदयनराजेंची भेट घेतली. खासदार उदयनराजें यांच्यासमवेत त्यांची चर्चा झाली. मनसेचे प्रमूख राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांनी फोन लावून खासदार उदयनराजे यांच्याकडे दिला. त्यांनी फोनवर त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधला. अमित ठाकरे हे बाहेर पडताना त्यांना पत्रकारांनी गाठले. त्यांना विचारले असता, अमित ठाकरे म्हणाले, साताऱयाला प्रथमच आलो आहे. साताऱयाला आलो आणि राजेंना नाही भेटलो असे नाही होवू शकत. पहिले विचारले महाराज साहेब आहेत का?, आहेत असे समजल्यावर पहिले जावून भेटलो. त्यांची आणि माझी राजकीय भेट नव्हती. आमचे घराण्याशी खूप जुने संबंध आहेत. त्यांना मुलगा आल्यासारखे वाटले. मी त्या नात्याने त्यांना भेटायला आलो होतो. त्याना भेटून खूप बरे वाटले. माझी पर्सनल भेट होती, असे त्यांनी सागितले. तर उदयनराजेनीच स्वतः सांगितले की पफ्युम कुठल दिली त्यांना. बलगारीज मॅन नो लाँगर स्माल बॉय यु टेक केअर ऑल ऑफ असे सांगितले.








