जयसिंगपूर प्रतिनिधी
Rajendra Patil Yadravkar : शिरोळ तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या सतरा ग्रामपंचायतचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखताना काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत १७ पैकी दहा ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे.
बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला पण यड्रावकर गटाच्या समर्थकानी चिवट झुंज देत विजय खेचून आणला. यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या.आमदार राजेंद्र पाटील यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मंत्री आणि आमदारकीच्या कार्यकाळात शिरोळ तालुक्यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पक्ष,गट तट,संघटना, जात-धर्म न पाहता केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामाची नोंद शिरोळ तालुक्याच्या जनतेने घेतली आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिरोळ तालुक्यातील गावागावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सर्व गावांचा कायापालट करू शकतात याच आत्मविश्वासाने गावागावांमधील मतदारांनी मतदान केल्याचे एकूण निकालावरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा- कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट,अकिवाट,कवठेसार,उमळवाड,औरवाड,नवे दानवाड,कनवाड,संभाजीपुर,हेरवाड आणि चिंचवाड या गावांमध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या दैदिप्यमान यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.हिवाळी अधिवेशना निमित्त नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
गावा गावातील नागरिकांनी विकास कामाला महत्त्व दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होते, ग्रामपंचायत ही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असते त्यामुळे ग्रामपंचायती मध्ये जाणारे पदाधिकारी गावासाठी तळमळीने काम करणारे असावेत अशीच मतदारांची अपेक्षा असते, मागील दोन अडीच वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी आपण आणून गट तट पक्षभेद जात-पात न पाहता तालुक्यातल्या प्रत्येक गावाला योग्य प्रमाणात निधी देऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला, शिरोळ तालुक्यातील जनतेला आमच्याकडून आणखी अपेक्षा आहेत त्यामुळेच जनतेने आमच्या विचारांचे प्रतिनिधी गावागावात निवडले आहेत, सर्व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व या सर्व गावांमधील निवडूण आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे मी अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो.
आमदार, राजेंद्र पाटील यड्रावकर
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









