मुंबई :
जेएसडब्ल्यू समुहाने राजीव मेहता यांची वाहतूक युनिट जेएसडब्ल्यू ऑटोचे व्यवसाय प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मेहता हे कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयातून पार्थ जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या सहकार्याने काम करतील.
पार्थ जिंदाल म्हणाले, ‘मेहता एका महत्त्वाच्या वेळी जेएसडब्ल्यू ऑटोमध्ये सामील झाले जेव्हा आम्ही वाहतूक क्षेत्रात, विशेषत: ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्षेत्रात वेगाने विस्तारासाठी तयार आहोत.’ जेएसडब्ल्यूमध्ये सामील होण्यापूर्वी मेहता यांनी महिंद्रा अँड महिंद्रा येथे ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख (व्यवसाय धोरण, परिवर्तन आणि विश्लेषण) म्हणून काम केले आहे. त्यांच्या कामाच्या अनुभवाचा कंपनीला भविष्यात नक्कीच फायदा होणार यात शंका नाही, असेही जिंदाल म्हणाले.









