वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सलामीचा फलंदाज रजत पाटीदार याला दुखापत झाल्याने तो आता सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही. पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. पाटीदारच्या दुखापतीमुळे बेंगळुर संघाला माठा धक्का बसला आहे. दरम्यान पाटीदारच्या जागी अद्याप दुसऱ्या बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.
रजत पाटीदारला स्नायू दुखापतीचा त्रास सुरू झाला असून त्याची ही दुखापत बरी होण्यास बराच कालावधी लागेल असे सांगण्यात आले. पायाच्या टाचेला झालेली ही दुखापत किरकोळ नसल्याने त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे.









