वृत्तसंस्था / जयपूर
आय लीग फुटबॉल स्पर्धेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान युनायटेड एफसी संघाने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला.
नव्या वर्षातील चर्चिल ब्रदर्सचा हा दुसरा पराभव आहे. शनिवारच्या सामन्यात राजस्थान युनायटेड एफसी संघातील स्पॅनिश खेळाडू आर्टिगेसने 93 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक गोल केला. या स्पर्धेतील अन्य एका समान्यात नामधारी एफसीने शिलाँग लेजाँगचा पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात 20 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. चर्चिल ब्रदर्स 19 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून राजस्थान युनायटेड एफसी संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.









