फोंडा :
राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात राजस्थान, पंजाब, हरियाणा व मध्यप्रदेशच्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील या स्पर्धा फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहेत.
महिलांच्या वैयक्तीक गटात राजस्थान व पंजाबच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्ण व रौप्यपदकासाठी ते खेळणार आहेत. मध्यप्रदेश व महाराष्ट्रचे खेळाडू कांस्यपदकासाठी खेळतील. महिलांच्या सांघिक गटात राजस्थान व पंजाब यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. मध्यप्रदेश व महाराष्ट्र हे कांस्यपदकासाठी लढतील. मिश्र स्पर्धेत हरियाणा व मध्यप्रदेश हे अंतिम फेरीत पोचले असून सुवर्णपदकासाठी ते झुंज देणार आहे. पंजाब व उत्तरप्रदेश यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होईल.









