मुख्यमंत्री-पालकमंत्र्यांकडून विचारपूस
प्रतिनिधी/बेळगाव
बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनात भाग घेण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील एका राज्यसभा सदस्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमधील राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांची प्रकृती खालावली आहे. लगेच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उपचारासाठी इस्पितळात हलविले. शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री के. जे. जॉर्ज, विधानपरिषद सदस्य डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या व नटराज जानकीराम आदींनी नीरज डांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केला









