आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून 99 पैकी किमान 40 ठिकाणी नविन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून वरिष्ठ नेत्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची झोप उडाली आहे. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार निवडणुकीच्या तोंडावर पक्षाविरोधाच मतदारांची नाराजी वाढू नये म्हणून काँग्रेसची हि राजकिय व्युहरचना असल्याचे बोलले जात आहे.
राजस्थान विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा राजकिय घडामोडी वाढत चालल्य़ा असून राजस्थानच्या राजकारणात फेरबदलही केले जात आहेत. काँग्रेसने काही दिवसापुर्वी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा तिकिट वाटपावर मोठा परिणाम होणार असून त्याद्वारे काँग्रेसच्या नविन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे आपापल्या गटातील आमदारांना अभय मिळण्यासाठी राज्याचे दोन्ही नेते प्रयत्नशील असल्याचेही दिसत आहे.
काँग्रेसच्या हायकमांडकडून 40 नविन चेहऱ्यांना बदलण्याचा विचार सुरु असल्याच्या बातमीने काँग्रेसच्या राजस्थानमधील विद्यमान आमदारांची झोप उडवली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्रमही ठप्प झाल्याने पक्षाने आपला निवडणूक प्रचार आक्रमकपणे सुरू करण्यावर भर दिला आहे. पक्षाच्या एका सूत्रानुसार, गेहलोत सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे काँग्रेसला राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपचा पराभव करण्यात मदत होऊ शकते.
तसेत गेहलोत सरकारने राबवलेल्या लोकप्रिय योजनांचाही या निवडणुकांवर प्रभाव पडणार असून त्यामध्ये 500 रुपयांचे अनुदानित एलपीजी सिलिंडर वितरण आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची हमी देणारी ‘चिरंजीवी योजना’ यांचा समावेश आहे.
पुढच्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर रोड शो, जाहीर सभा, घरोघरी प्रचार यासह अनेक कार्यक्रम काँग्रेसने हातात घेतले असून यातून सरकारच्या कामांवर प्रकाश टाकला जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेक नेत्यांच्या सार्वजनिक रॅली राज्यभरातील होणार आहेत.” सूत्राने सांगितले.









