ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याने एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी राहुल जोशी यानं लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोपी पीडित तरुणीनं केला आहे. या प्रकरणी आरोपी रोहित याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथक आज सकाळी जयपूरला पोहोचलं होतं. या पोलीस पथकात एकूण १५ पोलीस अधिकारी होते. पण रोहित जोशी या ठिकाणी आढळला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मंत्री महेश जोशी यांच्या जयपूरमधील दोन घरांवर छापेमारी केली. पण दोन्ही ठिकाणी मंत्र्यांचा मुलगा रोहित जोशी आढळून आला नाही. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आमची पथके फरार असलेल्या रोहित जोशीचा शोध घेत आहेत.” शोध घेऊनही आरोपी न आढळल्याने पोलिसांनी आरोपी रोहित जोशी याला समन्स बजावला असून १८ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. याबाबतची समन्सची प्रत पोलिसांनी आरोपीच्या घराच्या भिंतीवर चिटकवली आहे.
राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिस त्याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यासाठी जयपूरला पोहोचली आहे. एसीपींसह टीम जयपूरला पोहोचली असून जवळपास १५ जणांचा यामध्ये समावेश आहे. एका २३ वर्षीय तरुणीने महेश जोशींच्या मुलाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.