डॉ. रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन
ओटवणे प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज यांनी देशात समतेचा सर्वप्रथम पुकार करून वारकरी संप्रदायातून देशातील भेदाभेद हा अधर्म असल्याचे विचारातून मांडले. त्याच वारकरी संप्रदायाचा आदर्श आपल्या राज्यकारभारात अमलात आणून प्रजाहित दक्ष राजे आणि करूणेचा संगम अशी बिरुदावली राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाने प्रजेत निर्माण केली. असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत तथा मनोविकारतज्ञ डॉ. रुपशे पाटकर यांनी केले.सावंतवाडी येथील समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि स्वतंत्र भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास’ या विशेष व्याख्यानात डॉ. पाटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, संस्थेचे सचिव मोहन जाधव, प्रा. डॉ. गणेश मर्गज आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम असनकर, स्वागत विठ्ठल कदम, ओळख मोहन जाधव यांनी, सुत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी तर आभार कांता जाधव यांनी मानले.









