प्रतिनिधी,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव 2023’चे आयोजन केले होते. या महोत्सवात शाहू महाराजांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे 19 माहितीपट आले होते. विजेत्या पाच माहितीपटांचे क्रीनिंग करण्यात आले. महोत्सवात चेतन सूर्यवंशी यांच्या ‘कोल्हापूर ते मिरज रेल्वे’ या माहितीपटाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
माहितीपट महोत्सव समृद्धी पाटील यांच्या ‘साठमारी’ला द्वितीय पारितोषिक, सोनाली हुंबरे यांच्या ‘मोतीबाग तालीम’ला विशेष परीक्षक पुरस्कार, उत्कृष्ट ध्वनी पारितोषिके प्राप्त झाले. सिमरन ठाणेकर यांच्या ‘लक्ष्मी-विलास पॅलेस’ व पल्लवी पाटील यांच्या ‘विचार शाश्वत वसतिगृहांचा’ उत्कृष्ट छायाचित्रण आणि उत्कृष्ट संकलन पारितोषिके मिळाली.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र जागतिक पातळीवर पोहोचावे, महाराज सर्वांना कळावेत, या उद्देशाने शाहू महाराजांचे चरित्र 27 भाषांमध्ये प्रकाशित करण्याचे काम सुरु आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शाहूंचे योगदानाचा जागर झाला. कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, लोकोत्तर व्यक्तींचे कर्तृत्व महान असते. नि:स्वार्थ भावनेतून समाजहिताचे कार्य अशा व्यक्तींकडून होत असते. माहितीपट निर्मितीचे काम विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.
चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया व दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक करताना महोत्सवाचे महत्त्व सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, परशराम पवार यांनी परिश्रम घेतले. पल्लवी पाटील व जावेद तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









