आगमन मिरवणुकीतील मंडळांचे अहवाल तयार : अध्यक्ष, उपाध्यक्षांसह डॉल्बी मालकांचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेश आगमन मिरवणुकीमध्ये आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 51 तरुण मंडळे व त्यांच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यास राजारामपुरी पोलिसांनी प्रक्रिया सुरु केली आहे. पोलिसांनी या मंडळांच्या घेतलेल्या आवाजाच्या नमुन्यांसह अहवाल तयार करुन न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. यानंतर मंडळाचे अध्यक्ष, डॉल्बी चालक, मालक यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
शहरातील आगमन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणुकीकडे जिह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदा आगमन मिरवणुकीमधील ड्रॉ मध्ये 54 मंडळांनी सहभाग घेतला होता. मात्र यापैकी 36 मंडळांनी प्रत्यक्ष मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. यापैकी 18 मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला नाही. तर 5 मंडळांनी आपल्या मंडपाच्या ठिकाणीच साऊंड उभा करुन मिरवणूक काढली होती. शनिवारी शहरातून निघालेल्या आगमन मिरवणुकीमध्ये 102 मंडळांच्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घेतले होते. यापैकी 51 मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले. यानुसार जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी राजारामपुरी पोलिसांनी या मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह डॉल्बी मालक, ट्रॅक्टर चालक यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या सर्वांचा अहवाल तयार करुन न्यायालयामध्ये सादर करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनीप्रदूषण कायद्यान्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
राजारामपुरीतील 31 मंडळांवर कारवाई
टेंबलाईनाका तरुण मंडळ (रियाज शेट), एकदंत मित्र मंडळ (तुषार माने), जय बजरंगबली मित्र मंडळ (संदीप पाथरुट), चिंतामणी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ प्रणित हिंदवी स्पोर्टस (कौशिक थिटे), राजारामपुरी तालीम (आर. टी. ग्रुप) (शुभम ठोंबरे), बाल गणेश तरुण मंडळ (चेतन शहा), गणेश तरुण मंडळ कोल्हापूरचा विघ्नहर्ता (सचिन चौगुले), जय शिवराय तरुण मंडळ (श्रीयश आथणे), छत्रपती राजे शिवाजी तरुण मंडळ (आशिष कांबळे), शिव गणेश मित्र मंडळ (चव्हाण), न्यू गणेश मंडळ (वृषभ कापसे), जय शिवराय मित्र मंडळ (जे. एस. ग्रुप) (अक्षय जितकर), फ्रेंडस तरुण मंडळ (शैलेश जाधव), राधेय मित्र मंडळ (अभिलाष पाटील), चॅलेंज स्पोर्टस (निखिल पालकर), चॅन्सलर फ्रेंड्स सर्कल (विनोद पाटील), अजिंक्यतारा मित्र मंडळ (मोहम्मद तेरदाळ), प्रिन्स शिवाजी फ्रेंड्स सर्कल (संदीप शिंदे), जय शिवराय मित्र मंडळ (प्रकाश मळगेकर), जिद्द युवक संघटना (ओंकार वाझे), क्रांतीवीर तरुण मंडळ (वृषभ बामणे), वेलकम फ्रेंड्स सर्कल (रुणाल कुऱ्हाडे), किर्ती तरुण मंडळ (मनोज कलकुटकी), हनुमान तालीम मंडळ (कपिल कवाळे), स्वामी समर्थ मित्र मंडळ (सिकंदर शेख), सस्पेन्स फ्रेंड्स सर्कल (आरिफ कुडचीकर), दि गणेश सांस्कृतिक सेवा मंडळ (एस. एफ.) (योगेश लोंढे), शिवशक्ती मित्र मंडळ (सूरज ककमेरे), इंद्रप्रस्थ तरुण मंडळ (स्वप्नील जगताप), फायटर बॉईज (सिद्धांत लोहार), अचानक मित्र मंडळ (नीलेश चव्हाण).
जुना राजवाडा
उपनगरचा राजा न्यू ग्रुप, आपटेनगर (आतिक मलबारी), न्यू तुळजाभवानी तरुण मंडळ, साने गुरुजी वसाहत (अनिकेत आळवेकर), मृत्युंजय मित्र मंडळ, साने गुरुजी वसाहत (प्रणव जाधव), ए बॉईज तरुण मंडळ, साने गुरुजी वसाहत (किशन अनंतपूरकर), दत्ताजीराव काशिद चौक तरुण मंडळ (आदेश कांबळे) आणि जादू ग्रुप, टेंबे रोड (श्रेयस पाटील) या मंडळांवर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली.
लक्ष्मीपुरी ठाण्याअंतर्गत कारवाई
जिव्हाळा कॉलनी मित्र मंडळ (ओम पाटील), स्वराज्य तरुण मंडळ, फुलेवाडी (रोहित लायकर), हनुमान सेवा मंडळ, शुक्रवार पेठ (यश घाडगे), सोल्जर तरुण मंडळ, तोरस्कर चौक (प्रशांत चिले) आणि अमर तेज तरुण मंडळ, रविवार पेठ (अनिल पाटील) या मंडळांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी कारवाई केली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई
पंचमुखी तरुण मंडळ (सागर आमते), जय शिवराय तरुण मंडळ (सचिन ठोंबरे), उलपे मळा मित्र मंडळ (रोहन कोलीलकर), जयहिंद स्पोर्टस मित्र मंडळ (संकेत पोहाळकर), हिंदुस्थान मित्र मंडळ (प्रसाद चव्हाण), न्यू संयुक्त शाहूपुरी मित्र मंडळ (पृथ्वी मोरे), दी ग्रेट तिरंगा मित्र मंडळ (राजेश मोरे), श्री कृष्ण मित्र मंडळ (संतोष भिरंजे) आणि कूचकोरवी समाज विकास मित्र मंडळ (साईनाथ मोरे) या मंडळांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली.