राधानगरी/ महेश तिरवडे
Rajaram Sugar Factory Election : छ.राजाराम साखर कारखाना निवडणूकीसाठी अतंत्य चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात सकाळी साडे दहापर्यंत 50 टक्के राधानगरी येथील मतदान केंद्रावर नोंदलेले आहे. 285 पैकी 140 मतदारानी आपला हक्क बजावला. या मतदान केंद्रावर राधानगरी सह फेजीवडे, पडळी, पिरळ, सावर्धन, सोन्याची शिरोली या गावाचा समावेश आहे.
अधिक वाचण्यासाठी – शाहूवाडी तालुक्यात राजाराम कारखान्याच्या मतदानासाठी चुरस
सकाळी आठ पासुन मतदारांनी राधाबाई कन्या शाळा या केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे पहिल्या दोन तासात इर्षेच्या वातावरणात पन्नास टक्के मतदान नोंदले आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केल्याचे चित्र तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळी दहा पर्यंत पहायला मिळत होते. दोन्हीही गटाकडून मतदारांना ने आण करण्यासाठी वाहनांची सोय केली आहे. तर दोन्हींही गटाकडून सभासदांना व समर्थकांना अल्पोपहारची सोय केली होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









