Rajaram Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता-23) रोजी चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले. आज मंगळवारी (ता- 25) रोजी रमण मळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. 29 टेबलवर दोन फेऱ्यांत ही प्रक्रिया होणार असून, दुपारपर्यंत गुलाल कोणाचा, हे स्पष्ट होईल. दरम्यान आज सकाळपासूनच दोन्ही गटाचे कार्यकर्ते रमणमळा परिसरात जमले आहेत.
हेही वाचा- आज कळणार कंडका कोणाचा पाडणार, राजाराम कारखान्याची मतमोजणी आज, सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी ठिकाणी थांबायची ठिकाणी निश्चित केली आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या छत्रपती राजश्री सहकार आघाडीच्या समर्थकांनी ड्रीमवर्ल्डजवळ धोबी घाट परिसरात थांबण्याची जागा निश्चित केली आहे. आणि आमदार सतेज पाटील यांच्या राजश्री छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे समर्थकांना शासकीय धान्य गोदामामागे शंभर कोटी रोडवर थांबण्याची व्यवस्था केली आहे.
Previous Articleआज कळणार कंडका कोणाचा पाडणार, राजाराम कारखान्याची मतमोजणी आज, सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला
Next Article राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत लक्ष्मीचा डंका









