प्रतिनिधी,कोल्हापूर
छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणूक ही कोल्हापूरचे सभासद विरुद्ध हुकूमशाही अशी असून हा कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील 600 सभासदांऐवजी 12 हजार खऱ्या सभासदांच्या मालकीचा व्हावा, असे मत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी शक्ती प्रदर्शनाने परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांचे एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी सभासदांच्या प्रबळ पाठींब्यावर कारखान्यामध्ये परिवर्तन घडविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
परिवर्तन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजता इच्छ़ुक उमेदवारांसह मोठ्या संख्येने सभासद व कार्यकर्ते सासणे मैदानावर एकत्र आले. तेथून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत सर्व उमेदवार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल झाले. ‘आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा, राजाराम कारखान्यावर परिवर्तन घडवायचं’ अशा घोषणा देत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, राजाराम कारखान्यावर गेली 28 वर्षे सत्ता असूनही कारखान्यामध्ये को-जनरेशन प्रकल्प नाही, डीस्टिलरी केली नाही, इथेनॉल प्रकल्प उभारला नाही. तसेच ऊस उत्पादक सभासदांना अन्य कारखान्यांच्या तुलनेत प्रति टन रुपये 200 दर कमी देऊन पाप केले आहे. ही लढाई पाटील विरुद्ध महाडिक नसून कार्यक्षेत्रातील 12 हजार सभासद विरुद्ध बाहेरील 600 सभासदांच्याविरुद्ध आहे. सध्याची निवडणूक सभासदांनी आपल्या हातात घेतली असून ‘आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा, राजाराम कारखान्यावर परिवर्तन घडवायचं’ असा निर्धार सभासदांनी केला असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी इच्छुक उमेदवारांसह कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









