Rajaram Factory Election : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. तर उत्पादक गटाच्या मतमोजणीमध्ये सतेज पाटील गटाच्या बेनाडे शालन बाबुराव यांना 2441 आणि भोसले किरण बाबासो यांना 2413 मते पडली. महाडिक गटाच्या भोसले विजय वसंत यांना 3244 आणि मगदूम संजय बाळगोंडा यांना 3169 मते मिळाली.
आतापर्यंत 5 हजार 600 मते मोजण्यात आली आहेत. यामध्ये पहिल्या फेरीत महाडिक गटाला 700 मतांची लिड मिळाली.सुरुवातीला हातकणंगले तालुक्यातील मतमोजणी सुरु झाली. पहिल्या टप्यांत 29 तर दुसऱ्या टप्य्यात 30 ते 58 केंद्रांची मतमोजणी होणार आहे. संस्था गटातील मतमोजणी दुपारनंतर पार पाडणार आहे.माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस पाहायला मिळतेय.
गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान
आमदार बंटी पाटील पॅनल
बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते
भोसले किरण बाबासो-2413
महाडिक पॅनेल
भोसले विजय वसंत -3244
मगदूम संजय बाळगोंडा-3169
Previous Articleडॉ.रवी पाटील यांचा सदाशिवनगर परिसरात प्रचार
Next Article मुरलीधर पाटील यांचा बेळगावच्या संघटनांतर्फे सत्कार









