Rajaram Dam गेले दोन दिवस जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 17 फुटावर आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवर असलेला राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊल पडत आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला जोर वाढला असून शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.
आज दुपारी 4 वाजे पर्यंत पंचगंगेची पाणीपातळी 17 फुटावर होती. राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून या मार्गावरिल वाहतूक बंद केली आहे. बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त असून लोकांनी धोकादायक स्थितीत वाहतूक करू नये सावन पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे









