Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना अपात्र उमेदवार सुनावणीला सुरूवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयात ही सुनावणी सुरु आहे. कारखान्याला नियमित नियमानुसार ऊस न घातल्याचा ठपका ठेवत सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छाणणीत अवैद्य ठरले होते. यासंदर्भात ही सुनावणी आहे.
राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा असं म्हणत सतेज पाटील यांनी महाडिकांना आव्हान दिले. 21 जागांसाठी तब्बल 236 अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी 135 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले . यावेळी सतेज पाटील गटाचे
29 उमेदवारांचे अर्ज छाणणीत अवैद्य ठरवण्यात आले. यानंतर आक्रमक सतेज पाटलांनी निवडणूक बिनविरोध होणार नाही.आम्ही न्यायलयीन लढाई लढू असा पवित्रा घेतला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









