राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी अमल महाडिक राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी सभासदांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा वर्षात मिळवलेले जवळपास अडीचशे कोटी रुपये गेले कुठे? असा थेट सवाल विरोधकांना केला.
यावेळी बोलताना त्यांनी राजाराम कारखाना आणि डी वाय पाटील कारखाना यांच्यातील गेल्या बारा वर्षाच्या दराचा तुलनात्मक आढावा सभासदांसमोर मांडला.उत्पन्नाचा कोणताही इतर मार्ग नसताना राजाराम कारखान्याने सभासदांना डी वायच्या बरोबरीने दर दिला आहे किंबहुना काही वेळा अधिक दर दिला आहे. को-जनरेशन आणि इतर उपपदार्थ निर्मिती यंत्रणा असूनही डीवाय ने तुलनेने कमीच दर दिला आहे. गेल्या बारा वर्षांचा विचार केला तर जवळपास अडीचशे कोटी रुपये को जनरेशन आणि उपपदार्थ विक्री मधून डीवायला जास्तीचे मिळाले असतील, पण हे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या झोळीत न जाता कुणाच्या खिशात गेले? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असे आव्हान अमल महाडिक यांनी दिले. राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शक असून केवळ संभ्रम पसरवण्यासाठी विरोधकांची बॅनरबाजी चालली आहे. पण अशा पोस्टर बॉईजना सुज्ञ सभासद थारा देणार नाहीत असा टोलाही महाडिक यांनी लगावला.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सर्जेराव माने यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी दोन वेळा अध्यक्ष पद भोगले त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच हुकूमशाहीची जाणीव कशी झाली असा सवाल शिवाजी पाटील यांनी उपस्थित केला. सरड्या प्रमाणे रंग बदलणारे सर्जेराव आता सरडे राव म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत अश्या शब्दात शिवाजीराव पाटील यांनी सर्जेराव माने यांची खिल्ली उडवली. तुमचा पूर्व इतिहास पाहता निवडणुकीनंतर आमचे पाय धरायला येऊ नका, असा सज्जड दमही शिवाजी पाटील यांनी सर्जेराव माने यांना दिला.यावेळी दत्तात्रय निले, राजाराम मोरे, गोविंदा चौगुले, पवन महाडिक, विजय महाडिक, मारुती चौगले, चंद्रकांत पाटील, प्रकाश डेळेकर, शामराव चौगले, महादेव चौगले, आनंद धनवडे, महेश निल्ले, शरद लिंग्रज विजय ढेरे, मारुती पाटील