राजन तेलींचा खासदार सुप्रिया सुळे यांना सवाल
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात तुमची काँग्रेस- राष्ट्रवादीची 53 वर्ष सत्ता होती . आणि त्यातील चार टर्म तुमचे पितामह राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. मग एवढ्या वर्षात तुम्ही कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केले. फक्त निवडणुका डोळ्यासमोर दिसल्या की कोकणात सिंदुर्गात यायचं . आणि आमचं प्रेम आहे असं दाखवायचं. 32 वर्षांपूर्वी वेळागर ,आरवली भागात ताजसारख्या मोठ्या हॉटेल्स साठी जागा घेतल्या होत्या मग तेथे टुरिझम का झाले नाही. सी वर्ल्ड ,नाणार प्रकल्पाला कोणी विरोध केला हे तुम्ही कधीच तुमच्या सोबत असलेल्या शिवसेनेला विचारणार आहात का? तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्या आहात. त्यामुळे तुम्ही या कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय करणार हे सांगा. उगाच येथील जनतेची दिशाभूल करू नका. असे भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले .









