महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट”
सावंतवाडी , प्रतिनिधी
सावंतवाडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चार नोव्हेंबरला भेट घेतली. या भेटीत तेली यांनी निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी आशीर्वाद घेतला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्याचे संकेत देण्यात आले आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि प्रचाराला अधिक गती मिळण्याची आशा आहे.









